
पिंपरी(प्रतिनिधी)
समाजाला आज ज्ञानासोबतच चरित्र्य आणि नीतीमत्तेची आवश्यकता आहे. असे मत ८९ व्या अखिल मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी व्यक्त केले.
पिंपरी चिंचवड मुख्याध्यापक संघाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या गुणवत्ता संवर्धन अभियानातील उपक्रमशील शाळा व गुणवंत शिक्षक पुरस्कार समारंभा प्रसंगी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून ८९ व्या अखिल मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस उपस्थित होते. डॉ. श्रीपाल सबनीस पारितोषिक वितरण करण्यात आले.यावेळी ते बोलत होते.
डॉ सबनीस पुढे म्हणाले कि,शिक्षकांनी माणूस हा किती घडवला आहे हा महत्त्वाचा भाग आहे जातिवाद आणि धर्मवाद शिक्षकाला नाही. गुणवत्ता वाढवण्यासाठी वाईट विचार घेऊ नये.तसेच गुणवत्ता संवर्धन मधील उपक्रमशील शाळांचे अभिनंदन केले त्याचबरोबर आयआयबी इन्स्टिट्यूट चे त्यांनी कौतुक करत असताना सांगितले आज हे इन्स्टिट्यूट सरकारच्या समांतर काम करत आहे म्हणूनच यामधून हजारो डॉक्टर इंजिनीयर घडत आहेत गोरगरीब विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी ॲड.महेश लोहारे यांचे कार्य तितकेच उल्लेखनीय आहे त्यांचे हे कार्य कौतुकास्पद आहे असेही त्यांनी आवर्जून सांगितले शाळेमध्ये स्वच्छता ग्रहापासून ते शाळेच्या कार्यालयापर्यंत शाळेची स्वच्छता असली पाहिजे आजच्या समाजाला चारित्र्य राहिले नाही संतवचन व महापुरुषांचे वचन जपले पाहिजे पुणे जिल्हा परिषदचे शिक्षणाधिकारी डॉ भाऊसाहेब कारेकर यांच्या कामाचे त्यांनी कौतुक केले तसेच त्यांनी पुढे बोलताना सांगितले आजच्या समाजाला ज्ञानाची गरज नसून चारित्र्याची व नीतीमत्तेची गरज आहे साने गुरुजी चे विचार आज होणे अपेक्षित आहे दिवसेंदिवस ज्ञानाच्या शाखा समृद्ध करणे काळाची गरज आहे निराशावादी शिक्षका पेक्षा आशावादी शिक्षक बना आज धर्म ,जात हे झूट आहेत ज्ञान आणि विज्ञान अध्यात्म आणि विज्ञान सर दंडात्मक मधून सत्य मुलांमध्ये पोहोचवणे ही काळाची गरज आहे पुढे बोलत त्यांनी असेही सांगितले विज्ञान हे विनाशक आहे युक्रेन पासून अमेरिका पर्यंत घडलेल्या घटनांचे दाखले त्यांनी दिखले दिले नोबेल पारितोषिक ज्ञानाच्या क्षेत्रातील कल्याणकारी सुखाची समृद्ध शाळा असावी यावरही त्यांनी भाष्य केले मूल्य मुलांमध्ये पेरणे ही काळाची गरज आहे. समाजाचा शाळांनी ,शिक्षकांनी विश्वास निर्माण करावा तुम्ही विश्वाचे नागरिक आहात शिक्षक हा सांस्कृतिक नायक आहे तो देशाचा, विश्वाचा नायक आहे असे महत्त्वाचे मुद्द्यांना हात घालत संवर्धन अभियानातील उपक्रमशील शाळांना व गुणवंत शिक्षक मुख्याध्यापक शिक्षकेतर कर्मचारी यांना पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या त्याचबरोबर पिंपरी चिंचवड शहराच्या शिक्षणाधिकारी व कार्यक्रमाचे अध्यक्षा संगीता बांगर मॅडम यांनी या कार्यक्रमास शुभेच्छा दिल्या पुणे जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी डॉ. भाऊसाहेब कारेकर यांनी पुणे जिल्ह्यातील शाळेची गुणवत्ता काय आहे? गुणवत्तेचा स्तर स्थिर न राहता तो वाढला पाहिजे व गुणवत्ता संवर्धन अभियानाचे कौतुक केले त्याचबरोबर पिंपरी चिंचवड शहर मुख्याध्यापक संघाने घेतलेला हा कार्यक्रम अतिशय सुंदर आहे याविषयी सुद्धा त्यांनी कौतुक केले आणि पुणे जिल्हा परिषद मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष नंदकुमार सागर सर यांनी सुद्धा या कार्यक्रमाचे कौतुक करत हा कार्यक्रम जिल्ह्यात उजवा ठरला आहे असे उद्गार त्यांनी व्यक्त केले यावेळी आय आय बी इन्स्टिट्यूट चे संचालक अड महेश लोहारे, राज्य संघाचे सचिव प्रसाद गायकवाड, पुणे जिल्हा संघाचे माजी अध्यक्ष हरिशचंद्र गायकवाड ,कैलास पवळे ,राजीव कुटे ,या कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित होते तसेच पिंपरी चिंचवड मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष संभाजी पडवळ, सचिव सुबोध गलांडे उपाध्यक्ष गणेश काळे अंबादास गर्जे ,संतोष काळे, सहसचिव उद्धव ढोले, अजय रावत खजिनदार बाबाजी शिंदे, शिवाजी गारगोटे , विद्यासचिव हनुमंत मारकड सर ,गणेश गवळी, हेमंत अभोंकर, नेहा पवार ,उपलंचीवार मॅडम उपस्थित होत्या यावेळी या कार्यक्रमाचे प्रास्ताविक संघाचे सचिव सुबोध गलांडे यांनी केले तर मान्यवरांचे स्वागत संघाचे अध्यक्ष संभाजी पडवळ यांनी केले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गांधी मॅडम यांनी केले तर कार्यक्रमाचे स्वागत गीत प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटी चे मॉर्डन विद्यालय निगडी व शाहू विद्यालय मधील विद्यार्थिनींनी गीत गायले कार्यक्रमाचे आभार संघाचे उपाध्यक्ष संतोष काळे यांनी केले