*डॉ. डी. वाय. पाटील औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयाला “ग्रीन रँकिंग २०२५ गोल्ड बँड” मध्ये स्थान*
डीवाय पाटील फार्मसी कॉलेजच्या वैभवात भर

आकुर्डी स्थित डॉ. डी. वाय. पाटील औषधनिर्माण शास्त्र महाविद्यालयाला आर. जागतिक संस्थात्मक श्रेणी (आर. डब्ल्यू. आय. रँकिंग) यांनी जाहीर केलेल्या भारतीय शाश्वत संस्था “ग्रीन रँकिंग २०२५ गोल्ड बँड” यादी मध्ये स्थान मिळविले आहे.
पर्यावरणीय शाश्वतेसाठी उच्च शिक्षण संस्थांच्या केलेल्या मुल्यांकनावर आधारीत ही श्रेणी देण्यात येते.
पर्यावरणीय शाश्वतेसाठी विशेष वचनबद्धता, पर्यावरण संबंधी जागरूकता आणि हरित संकुल उपक्रम हे मूल्यांकनाचे प्रमुख मुद्दे होते.
ऊर्जा कार्यक्षमता, कचरा व्यवस्थापन, पाणी संवर्धन, जैवविविधता जतन आणि नाविन्यपूर्ण शाश्वतता प्रकल्प यासारख्या सर्व समावेशक मापदंडांवर महाविद्यालयाचे मूल्यांकन केले गेले.
या गोल्ड बँड यादी मध्ये स्थान मिळाल्यामुळे पर्यावरण संवर्धन आणि हरित संकुल संकल्पना याबद्दलची महाविद्यालयाची वचनबद्धता दृढ होते असे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. निरज व्यवहारे यांनी सांगितले.
महाविद्यालयाच्या या यशासाठी संकुल संचालक रिअर अॅडमिरल अमित विक्रम (निवृत्त), विश्वस्त श्री. तेजस पाटील आणि संस्थेचे अध्यक्ष श्री. सतेज पाटील यांनी महाविद्यालयातील सर्वांचे अभिनंदन केले.