
श्री जैन विद्या प्रसारक मंडळ चिंचवड या संस्थेने सन 1927 पासून शैक्षणिक आणि सामाजिक कार्यात अग्रेसर असणारी संस्था म्हणून नावलौकिक मिळवले आहे. हेच कार्य पुढे नेण्यासाठी जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून श्री जैन विद्या प्रसारक मंडळ चिंचवड आणि श्रीमान शांतीलालजी भीकचंदजी कटारिया आदित्य बिल्डर्स यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 8 मार्च 2025 रोजी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे. हे शिबिर रसिकलाल एम धारिवाल इंटरनॅशनल स्कुल (CBSE) वाल्हेकरवाडी रोड, चिंचवड आणि संघवी केशरी कॉलेज व रसिकलाल एम धारिवाल फार्मसी कॉलेज फिनॉलेक्स कंपनी समोर, चिंचवड स्टेशन या दोन ठिकाणी एकाच वेळी आयोजित करण्यात येणार आहे.
पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरामध्ये दररोज 2000 पेक्षा जास्त रक्त पिशवीची गरज असते त्या प्रमाणात फक्त 1500-1600 पिशवी रक्त उपलब्ध असते यामुळेच सामजिक बांधिलकी जपत श्री जैन विद्या प्रसारक मंडळाने या रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे या मध्ये 15 पेक्षा जास्त रक्तपेढी संस्था आणि 2000 पेक्षा जास्त विद्यार्थी, पालक आणि परिसरातील नागरिक सहभाग नोंदवतील असा विश्वास श्री जैन विद्या प्रसारक मंडळाचे ट्रस्टी श्री सतीशजी चोपडा यांनी व्यक्त केला.
श्री जैन विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्री प्रकाशजी धारिवाल, कार्याध्यक्ष श्री शांतीलालजी लुंकड , ऑनरारी जनरल सेक्रेटरी अॅड.
श्री.राजेंद्रकुमारजी मुथा , खजिनदार श्री प्रकाशजी चोपडा, जॉईंट सेक्रेटरी प्रा. श्री अनिलकुमारजी कांकरिया, जॉईंट सेक्रेटरी श्री.राजेशकुमारजी साकला, ट्रस्टी श्री सतिशजी चोपडा आणि सर्व ट्रस्टी तसेच श्री जैन विद्या प्रसारक मंडळाच्या विभागातील सर्व शाळा आणि महाविद्यालयाचे मुख्याध्यापक आणि प्राचार्य यांनी पिंपरी चिंचवड व पुणे शहरातील सर्व नागरिकांना आव्हान केले आहे की जास्तीत जास्त नागरिकांनी मोठ्या उत्साहाने रक्तदान शिबीरामध्ये सहभाग नोंदवून रक्तदान करून आपले सामजिक कर्तव्य पार पाडावे.असे आवाहन आयोजकांनी केले आहे.