सामाजिकपिंपरी चिंचवड

लग्न उरकताच नव दाम्पत्याने केले वृक्षारोपण

रोटरी क्लब प्राधिकरणाचा पुढाकार

पिंपरी (प्रतिनिधी) रोटरी क्लब प्राधिकरणाच्या सहकार्याने कासारवाडी येथील नवविवाहित त्रिशाला आगरवाल आणि हिमांशू श्रीश्रीमल या जोडप्याने लग्न लागताच तासाभरात वृक्षरोपण करून वृक्ष संवर्धानाचा संदेश दिला. क्लबचे सदस्य विवेक आग्रवाल यांनी आपली कन्या त्रिशाला हिचा विवाह समारंभ सुस गाव येथे आयोजित केले होते.

यावेळी प्रांतपाल शितल शहा, ग्रीन प्रिओड्सचे अध्यक्ष नीना रायसोनी , रोटरी क्लब ऑफ प्राधिकरणाचे अध्यक्ष अजय लंके आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी प्रांतपाल यांनी वधु माता पिता पूजा व विवेक आगरवाल यांना पॉल हैरीस फेलो पीन देवून विशेष सन्मानित करण्यात आले. वऱ्हाडी मंडळी आणि सदस्यांच्या उपस्थितीत 101 झाडे लावली. याप्रसंगी अग्रवाल यांनी रोटरी फाऊंडेशनला 1 लाखांची देणगी दिली आहे. या वृक्षारोपणासाठी सनी निम्हण यांनी जागा उपलब्ध करून देत झाडाचे संगोपन करायची हमी दिली.रोटरीचे पर्यावरण संचालक वसंत मालुंजकर यांनी अर्जुन आणि कदंबच्या 6 ते 7 फूट उंचीचे 101 रोपटे उपलब्ध करून दिली. या कार्यासाठी रोटरी क्लब प्राधिकरणाचे अध्यक्ष अजय लंके आणि सर्व सदस्य यांनी पुढाकार घेतला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button