जगावं कसं हे शिवरायांकडून तर मरावं कसं हे संभाजी राजेंकडून शिकावे – जाधव
शाहू विद्यालयात शिवजयंती साजरी

चिखली (प्रतिनिधी) बोधिसत्व प्रतिष्ठान शिक्षण संस्था संचालित राजर्षी शाहू महाराज विद्यालयामध्ये बुधवार दि. 19 फेब्रुवारी 2025 रोजी *395 वा शिवजयंती महोत्सव* साजरा करण्यात आला.
आजच्या शिवजयंतीच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून संस्थेचे अध्यक्ष गोकुळ गायकवाड तसेच प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे सचिव लहू कांबळे व विद्यानंद भवन स्कूलचे साहेबराव जाधव , त्याचप्रमाणे संस्थेचे उपाध्यक्ष अंकुश कांबळे ,लहू गायकवाड , दामिनी पथकाच्या पोलीस हवालदार सुजाता शिंदे व महिला पोलीस शिपाई अश्विनी सोनवणे तसेच विद्यालयाचे मुख्याध्यापक बाबाजी शिंदे आवर्जून उपस्थित होते.
सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून पाहुण्यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला.
साहेबराव जाधव यांनी आपल्या कसं जगावे हे शिवाजी महाराजांनी शिकवलं आणि कसं मरावं हे छत्रपती संभाजी राजांनी शिकवलं असे त्यांनी आपल्या विचारातून प्रकट केले. शाळेच्या विद्यार्थ्यांनी भाषण, व नृत्याच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याचा गौरव आपल्या कृतीतून दाखवला. विद्यालयातील विद्यार्थिनींनी सुंदर असा शिवाजी महाराजांचा पाळणा गाऊन प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले. विद्यालयातील सर्व शिक्षकांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांची आरती प्रत्यक्षात विद्यालयात साकार करण्यात आली…
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संतोष घरडे, सुजाता जोगदंड, सुभाष कावळे, रूपाली पवार, उमेश माने ,पूनम तारख, कोमल गायकवाड, किशोर बडे, जयश्री महानवर, योगिता व्होनमाने, प्रमोद रायकर, अमोल सूर्यवंशी, धुडकू कुवर, स्वप्निल पठारे यांनी सहकार्य केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जितेंद्र सूर्यवंशी यांनी केले व आभार सौ. स्वाती पाटील यांनी मानले.