
जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने लोणावळा महिला पोलीस प्रशिक्षण केंद्रात सन्मान नारी शक्तीचा कार्यक्रम संपन्न झाला. सुमारे चार तास चाललेल्या या कार्यक्रमात 805 महिला पोलीस सहभागी झाल्या होत्या.
कठोर प्रशिक्षण घेत असताना असे आनंदाचे क्षण मिळाल्याचे समाधान प्रत्येकीच्या चेहऱ्यावर दिसले. संपूर्ण महाराष्ट्रातील या शिवकन्या होत्या. अत्यंत गरीब परिस्थितीतुन येऊन कठोर परिश्रम करत महाराष्ट्राचे संरक्षण करण्याची जबाबदारी आता काही महिन्यात त्या घेणार आहेत. सर्व प्रशिक्षणार्थी मुलींनी उस्फुर्त सहभाग घेत धमाल केली… आवडत्या गाण्यावर मनसोक्त नृत्य ही केले. सन्मान नारी शक्तीचा या कार्यक्रमाचे निर्माते साहेबराव जाधव आणि रवींद्र पवार यांनी मनोरंजक खेळ, गाणी ,गप्पा, विनोद, उखाणे सादर करत धमाल केली.
पोलीस प्रशिक्षण केंद्र खंडाळा चे मा. प्राचार्य श्री एम एम कानदार , मा. उपप्राचार्य संजय डहाके , श्री. प्रवीण लोखंडे , ए पी आय बन्सी कांबळे यांचे मार्गदर्शनाखाली तसेच PI अंजली खरे मॅडम, API सुवर्णा हासे, API शितल चव्हाण, API सीमा चौधरी, विधी निदेशक स्वाती तोरणे, मपोशि प्रियंका राठोड यांचे उपस्थितीत व सहकार्याने , 805 महिला पोलीस प्रशिक्षणार्थी यांच्यासाठी पोलीस प्रशिक्षण केंद्र खंडाळा मध्ये जागतिक महिला दिनाचे निमित्ताने कार्यक्रम आयोजित केला होता.