
चिखली (प्रतिनिधी ) नेवाळे वस्ती येथील गणेश इंटरनॅशनल स्कूल व जी.आय.एस प्ले स्कूल मध्ये ‘महिला दिवस’ अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजनाने झाली. या दिनानिमित् प्रमुख पाहुणे म्हणून टाटा मोटर्स मधील स्मिता शेवाळे यांची उपस्थिती होती. त्यांनी शाळेतील सर्व शिक्षकांना आपल्या बहुमूल्य विचारांनी मंत्रमुग्ध केले. स्त्रीचा सन्मान, स्त्रीचा गौरव , स्वत्व याविषयी त्यांनी प्रकर्षाने आपले मत मांडले.शाळेच्या मु्ख्याध्यापिका शिल्पा गायकवाड यांनी महिला दिनानिमित्त आपले बहुमूल्य विचार व्यक्त केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन धनश्री पिंगळे यांनी केले.
कार्यक्रमाला संस्थेचे अध्यक्ष एस बी पाटील, विश्वस्त गणेश पाटील, स्नेहल पाटील, आकाश पाटील, मंगेश पाटील प्रशासकीय अधिकारी प्रकाश गायकवाड, सहयोगी संचालक सुनील शेवाळे, शाळेच्या मुख्याध्यापिका शिल्पा गायकवाड, प्ले स्कूलच्या मुख्याध्यापिका भारती गडद, जी.एस् पाटील कॉलेज ऑफ मॅनेजमेंट अँड बिझनेस स्टडीज चिखली आणि सिद्धी कॉलेज ऑफ मॅनेजमेंट अँड बिझनेस स्टडीज , दापोडी येथील प्रभारी प्राचार्य अभिजित चव्हाण आणि राजेश व्हटकर , संस्था मीडिया प्रमुख त्यागिनी रामगडे , संस्थेच्या एच आर प्रमुख मोनिका गांजाले ,पर्यवेक्षिका माधुरी येवले, क्रीडा पर्यवेक्षक विनोद जगदाळे, पर्यवेक्षिका विजयालक्ष्मी हाके,तसेच सर्व शिक्षकवृंद, आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.