
चिखली (प्रतिनिधी) चिखली येथील पिंपरी चिंचवड महानगरपालिका शाळा क्र.९३, सोनवणेवस्ती शाळेमध्ये ” *ग्रीन नेचर फाऊंडेशन”* या संस्थेच्या वतीने *स्पिकींग इंग्लिश व आपत्ती व्यवस्थापन* या विषयावर मार्गदर्शनपर व्याख्याने व प्रात्यक्षिके झाली.
या कार्यक्रमासाठी मार्गदर्शक म्हणून रामचंद्र नेटके, अमर नेटके, बाजीराव कुऱ्हाडे आदी मान्यवर उपस्थित होते. समवेत शाळा व्यवस्थापन समिती माजी अध्यक्ष ज्ञानेश्वर सोनवणे व शाळेच्या मुख्याध्यापिका सुनिता पांडे , सर्व शिक्षक वृंद व कर्मचारी उपस्थित होते.
सकाळी एक तास इ.५वी ते ७वी विद्यार्थ्यांना इंग्रजी विषयाचा स्पिकिंग इंग्लिश कोर्स घेतला. संबंधित व्हिडिओ विद्यार्थ्यांना दाखवला. शब्द, वाक्यरचना, व्याकरण यांवर आधारित उदाहरणे घेतली.
सभागृहात शाळेच्या पार्किंग मध्ये आपत्ती व्यवस्थापन प्रात्यक्षिके करून दाखविली. आपत्ती व्यवस्थापनाची कारणे, उपाययोजना, गरज व महत्व समजावून सांगितले. विद्यार्थ्यांचा कृतीयुक्त सहभाग घेतला. अतिशय मोलाचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांनाही खूप आवडले.
शेवटी उपस्थित मान्यवरांचे सत्कार व आभार मानून कार्यक्रमाची सांगता झाली.