चाकण एमआयडीसी संघटनेच्या उद्योजकांनी वाचला वीज समस्यांचा पाढा
जयदेव अक्कलकोटे यांच्या पुढाकाराने कार्यक्रमाचे आयोजन

पिंपरी( प्रतिनिधी) चाकण एमआयडीसी उद्योजक संघटनेच्या उद्योजकांनी महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी ग्राहक गाऱ्हाणे निवारण मंचाचे अध्यक्ष महेंद्र दिवाकर यांच्यासमोर उद्योजकांनी वीज समस्यांचा पाढा वाचला.
चाकण एमआयडीसी उद्योजक संघटना गेली 5 वर्ष सलगपणे दर महिन्याच्या तिसऱ्या शुक्रवारी वेगवेगळ्या क्षेत्रातील तज्ञ मान्यवरांचा परिसंवाद आयोजित करीत असते. या सेमिनारसाठी शेकडो उद्योजकांची उपस्थिती असते.
मोरवाडी पिंपरी येथे वीज महावितरण संदर्भातील ग्राहकांचे हक्क व अधिकार याविषयी ग्राहक गाऱ्हाणे निवारण मंचाचे अध्यक्ष महेंद्र दिवाकर यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्योजकांचे चर्चासत्र संपन्न झाले. या सेमिनारसाठी पिं- चिं,चाकण, भोसरी,पुण्यातील अनेक उद्योजक उपस्थित होते.
समस्या –
1) नवीन मीटरला विलंब लागणे
2) ग्राहक म्हणून कधीच तशी सेवा मिळत नाही
3) अखंडित वीज पुरवठा कधीच नेहमी होत नाही मात्र एक दिवस जरी बिल भरायला उशीर केला की त्वरित वीज कनेक्शन कापले जाते.
4) पायाभूत सुविधांचा अभाव (इन्फ्रास्ट्रक्चर )
या सेमिनारमध्ये महेंद्र दिवाकर यांनी वीज महावितरणच्या विरोधामध्ये कशी दाद मागायची ? कोठे दाद मागायची ? तसेच सर्व नियम व कायदे याविषयी इत्यंभूत माहिती दिली.तसेच अनेक उद्योजकांनी त्यांच्यावर झालेल्या अन्यायाला वाचा फोडली त्याच्यावर अधिकृतपणे तक्रार करता येईल व त्यांना नक्की न्याय मिळेल. असे आश्वासन महेंद्र दिवाकर यांनी दिले.
प्रश्नोत्तराच्या सत्रामध्ये अनेक उद्योजकांनी विजेच्या सेवेबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. तसेच त्यांच्याविषयी घडलेल्या सत्य घटना कथन केल्या. त्यावर देखील महेंद्र दिवाकर यांनी सविस्तर मार्गदर्शन केले.
या संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन हे संघटनेचे अध्यक्ष जयदेव अक्कलकोटे, संचालक प्रवीण शिंदे, पुंडलिक गाणीगेर यांनी केले.
कार्यक्रमाचे मनोगत व आभार प्रदर्शन चाकण एमआयडीसी उद्योजक संघटनेचे अध्यक्ष जयदेव अक्कलकोटे यांनी केले.
फोटो ओळ-
डावीकडून चाकण एमआयडीसी उद्योजक संघटनेचे संचालक प्रशांत गोरे, पुंडलिक गाणिगेर, अध्यक्ष जयदेव अक्कलकोटे, चेअरपर्सन महिंद्र दिवाकर, संचालक प्रवीण शिंदे, मल्लिकार्जुन शिंदे व प्रभाकर खामकर