
भोसरी येथील राजमाता जिजाऊ शिक्षण प्रसारक मंडळाचे ,कला, वाणिज्य व विज्ञान, महाविद्यालयात
शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली .
महाविद्यालयामध्ये शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले.
याप्रसंगी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष व भोसरी विधानसभेचे प्रथम आमदार विलास लांडे,संस्थेचे सचिव सुधीर मुंगसे,खजिनदार अजितभ गव्हाणे, विश्वस्त विक्रांत लांडे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. के.जी. कानडे, उपप्राचार्य प्रा. किरण चौधरी, रजिस्ट्रार अश्विनी भोसले ,एमबीएचे डायरेक्टर डॉ . धनंजय बागुल, प्राचार्य डॉ. लक्ष्मण चौधरी, डॉ .श्रेया दाणी, डॉ. नेहा बोरसे,प्रा. सारिका जगताप, प्रा. गोपीचंद करंडे,सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते .
राजमाता जिजाऊ महाविद्यालयापासून ते लांडेवाडी शिवाजी पुतळ्यापर्यंत भव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते . त्यामध्ये विविध पारंपारिक वेशभूषेमध्ये विद्यार्थी व प्राध्यापक सहभागी झाले होते .
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा . गोपीचंद करंडे यांनी केले . सांस्कृतिक विभागाअंतर्गत हा कार्यक्रम यशस्वीरित्या संपन्न झाला .